‘अटक’पूर्वसाठी अजित पवार ‘शिवस्वराज्य’ यात्रा सोडून मुंबईत ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या मुंबईत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूरमधील शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहणार आहेत.

25 हजार कोटींच्या राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अखेर आर्थिक गुन्हे शाखेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बँकेचे तत्कालीन संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन संचालक काही अधिकारी आणि अन्य लोकसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अजित पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी ते मुंबईला गेले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदारपूरमधील शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूत गिरणी आणि साखर कारखान्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले होते. परंतु या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड नुकसान झाले.

आरोग्यविषयक वृत्त –