कोल्हापूरात ‘होर्डींग’वॉर : ‘परमनन्ट आमदार’ Vs ‘जनतेचं ठरलंय, ‘वारं फिरलंय’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत तशा राज्यभारतील विधानसभा मतदारसंघांमध्ये भावी उमेदवारांनी निवडणूकीसाठी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरच्या कागल भागात या पार्श्वभूमीवर होर्डींग वॉर सुरु झाले आहे. शिवसेना भाजप युतीचे समरजीत घाटगे यांचे जनतेचं ठरलंय, वारं फिरलंय तर विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचे फोटो असलेले परमनन्ट आमदार असे होर्डींग वॉर पहायला मिळाले आहे.

कागल मतदारसंघात शिवसेनेला हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तगडा उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे मुश्रीफ दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर युतीचं सरकार आल्यावर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच निवडणूकांमध्ये लक्ष घातले. त्यानंतर जिल्हा परिषदेत मोठं यश मिळवलं. तर कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष जिल्हापरिषदेवर झाला. त्यानंतर मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंदोलनं. मोर्चे काढून विविध मार्गांनी विरोध केला.

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करून हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. त्यानंतर तेथे गेली चार वर्षे समरजीत घाडगे यांनाच युतीचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी सुरु केला आहे.

एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गेल्या दहा वर्षात लोकांपर्यंत विविध योजना आणून त्याचा फायदा करून दिल्याने कागलच्या मतदारांनी ‘श्रावणबाळ’ अशी उपमा दिली आहे. तर दिवंगत विक्रमसिंह घाडगे यांच्या वारश्यावर समरजीत घाडगे गेली चार वर्षे जनतेमध्ये फिरत आहेत. लोकसभा निवडणूकीत आणचं ठरलंय हे वाक्य चांगलच गाजलं होतं. त्यानंतर आता पुन्हा या वाक्याचा पुनरुच्चार सुरु झाला आहे.

हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत परमनन्ट आमदार तर समरजीत घाडगे यांच्यासाठी जनतेचं ठरलंय, वारं फिरलंय, हवं नवं नेतृत्व अशा आशयाचे होर्डींग्ज झळकत आहेत. परंतु वारं खरंच फिरलंय की हसन मुश्रीफ परमनन्ट राहणार हे येणारी निवडणूकच ठरवेल.

सिने जगत –

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

You might also like