संगीतकार Bappi Lahiri कोरोनाने संक्रमित, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवुडचे दिग्गज संगीतकार बप्पी लहरी कोरोनाने संक्रमित आढळले आहेत. वृत्तानुसार, त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संगीतकार बप्पी लहरी यांच्या प्रवक्त्याने यास दुजोरा दिला आहे.

बप्पी दा यांच्यात कोरोनाची लक्षणे – रेमा
तर, बप्पी लहरी यांची मुलगी रेमा लहरी बन्सल यांनी माहिती देताना म्हटले की, बप्पी दा यांनी सातत्याने कोरोना गाईडलाईनचे पालन केले आणि प्रत्येक प्रकारची सावधगिरी बाळगली परंतु तरीही ते कोरोना संक्रमित झाले आहेत. बप्पी दा यांच्यात कोरोनाची काही लक्षणे आहेत जी पहाता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय संपूर्ण कुटुंबियांनी घेतला आहे.

संपर्कात आलेल्या लोकांना केले आवाहन
रेमा लहरी यांनी म्हटले की, बप्पी दा लवकरच घरी परततील. सोबतच त्यांनी चाहत्यांचे आभार व्यक्त करत म्हटले की, आपल्या सर्वांना धन्यवाद, प्रार्थना केल्याबद्दल. रेमासह बप्पी दा यांच्या कुटुंबियांनी त्या सर्व व्यक्तींना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले जे त्यांच्या संपर्कात आले आहेत.

चाहत्यांच्या शुभेच्छा हव्यात – बप्पी दा यांचे प्रवक्ते
बप्पी दा यांच्या प्रवक्त्याने म्हटले की, यावेळी बप्पी दा यांना केवळ त्यांच्या चाहत्यांच्या शुभेच्छा हव्या आहेत. त्यांनी म्हटले की, बप्पी दा यांचे म्हणणे आहे की, सर्वांनी कोरोना नियमाचे पालन करावे आणि निरोगी राहावे.