काय सांगता ! होय, 300 रूपये कमवणार्‍या महाराष्ट्रातील ‘या’ मजुराला इन्कम टॅक्सनं पाठविली 1 कोटीची नोटीस

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यातील कल्याण येथे राहणाऱ्या पेशाने मजूर असलेल्या भाऊसाहेब अहिरे यांना आयकर विभागाने एक कोटी पाच हजारांची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे अहिरे यांचे दिवसाचे उत्पन्न केवळ 300 रुपयांचे आहे आणि ते कल्याणमध्ये आपल्या परिवारासोबत एका झोपडपट्टीमध्ये राहतात. अहिरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत याबाबत माहिती दिली आहे.

आयकर विभागाच्या मते नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीच्या वेळी अहिरे यांच्या खात्यात 58 लाख रुपये जमा झाले होते. अहिरे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. अहिरे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पाच सप्टेंबर रोजी त्यांना एका खासगी बँक खात्यात 58 लाख रुपये जमा करण्याबाबत स्पष्टीकरण मागविण्याची विभागाची नोटीस मिळाली होती.

अहिरे यांनी सांगितले की, ते सुशिक्षित नसल्यामुळे त्यांनी याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांना सांगितले आणि त्यानंतर त्यांनी आयकर विभागाशी संपर्क केला. त्यावेळी त्यांना बँकेशी संपर्क करा असे सांगण्यात आले. बँकेत त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या नकली पॅन कार्ड आणि वोटिंग कार्डच्या साहाय्याने बँक अकाउंट उघडून त्यामध्ये पैसे जमा करण्यात आले. अहिरे यांनी स्पष्ट केले की, त्याची खोटी स्वाक्षरी करून बँक खाते खोलण्यात आले पॅनकार्डची झेरॉक्स लावण्यात आली तसेच त्यावर फोटो देखील वेगळा असल्याचे सांगितले.

यानंतर सात डिसेंबर रोजी आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली ज्यामध्ये 2017 – 18 मध्ये केल्या गेलेल्या व्यवहारासाठी एक कोटी पाच हजार रुपये कर भरण्यासाठी सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे आयकर विभागाकडून हे देखील सांगण्यात आले की, कर दिला नाही तर विभाग तीस दिवसांमध्ये वसुली करेल. अहिरे यांनी सांगितले की, आयुष्यात कधी एक लाख रुपये सुद्धा पाहिले नाहीत. तर एवढी मोठी रक्कम कोठून देणार. त्यामुळे अहिरे यांनी स्वत: पोलिसात तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like