महाराष्ट्र : 46 वर्ष जुनी होती जिलानी अपार्टमेंट, डेंजरसच्या लिस्टमध्ये नव्हती, तरी कोसळली बिल्डिंग

ठाणे : महाराष्ट्राच्या ठाणेजवळील भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत आतापर्यंत 8 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. तर 8 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. 1984 मध्ये बांधलेल्या जिलानी अपार्टमेंटचा एक घराचा भाग रात्री उशीरा कोसळला.

भिवंडी महापालिकेनुसार, जिलानी अपार्टमेंट, धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. या इमारतीमध्ये तळ मजला आणि तीन मजले होते. इमारतीमध्ये एकुण 40 फ्लॅट आहेत, ज्यामध्ये 150 लोक राहतात. इमारताखाली 25 ते 30 लोक अडकले आहेत, ज्यापैकी 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर 8 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

घटनास्थळी ठाणे जिल्हा प्रशासन, ठाणे डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचे 15 जवान आणि नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचे 30 जवान उपस्थित आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मलब्यातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये मोबिन शेख, सलमानी, रुक्सार कुरैशी, मोहम्मद अली, सबीर कुरैशी यांचा समावेश आहे. याशिवाय मृतांमध्ये जुबैर, फैजा, अयशा, बब्बू यांच समावेश आहे.