पालघरमध्ये साधुंची बेदम मारहाण करून हत्या, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा आणि संतांचा ‘आक्रोश’ (व्हिडीओ)

पालघर : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला ग्रामस्थांनी मारहाण केली. गुरुवारी रात्री मॉबलिंचिंगची घटना घडली असून आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण वाढले आहे. जुना अखाडा येथे दोन साधूंसोबत ग्रामस्थांनी त्यांच्या ड्रायव्हरची हत्या देखील जमावाने लाठीने मारहाण करून केली. विशेष असे कि पोलिसांच्या समोर मॉबलिंचिंग करण्याची ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात ११० लोकांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व साधू-संतांसह नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे, तर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरे यांच्या सरकारला इशारा दिला आहे की, मारेकऱ्यांविरूद्ध योग्य ती कारवाई झाली नाही तर राज्य सरकारविरोधात आंदोलन केले जाईल.

या घटनेला अमानुष म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, या घटनेचा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय आहे. कोरोना महामारीचे संकट असताना ही घटना आणखी चिंताजनक आहे. तसेच त्यांनी लिहिले की, सरकारकडे माझी विनंती आहे कि या घटनेचा उच्चस्तरीय तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर पालघरमध्ये या मॉबलिंचिंगच्या घटनेच्या वेळी १ किंवा २ पोलिस तेथे उपलब्ध नव्हते, तर संपूर्ण पोलिस सैन्य उपस्थित असतानाही ही घटना घडली आणि पोलिस मूक प्रेक्षक म्हणून उभे राहिले. या घटनेचा व्हिडिओ संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर करत म्हटले की, हा विचार करण्यास भाग पडते की पोलिसांची अशी काय मजबुरी होती कि त्यांच्या डोळ्यासमोर हा भयंकर गुन्हा घडला ? महाराष्ट्र सरकारला बऱ्याच गोष्टींची उत्तरं द्यायची आहेत.

https://twitter.com/sambitswaraj/status/1251959986105782272

संबित पात्रा यांनी घटनेचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत हा प्रकार ‘हृदयविदारक’ असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे लिहिले की, असहाय्य संत आपला जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या मागे धावत आहे आणि हे स्पष्ट दिसत आहे की पोलिस केवळ आपल्या जबाबदारीपासून मागे हटत नाहीत, तर असेही दिसत आहे कि त्या संतांना गर्दीत ढकलले जात आहे. महाराष्ट्रात हे काय होत आहे?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) ट्विट केले, पालघर घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला केला होता, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्हेगारी आणि लज्जास्पद कृत्य करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केले की, पालघरमधील मुंबईहून सूरत येथे जाणाऱ्या ३ लोकांची हत्या केल्यानंतर माझ्या आदेशानुसार या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या १०१ लोकांना पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे.