Maharashtra BJP | निधी वाटपावरुन भाजप आमदार नाराज, राजीनामा देण्याचा इशारा; फडणवीसांना पाठवलं पत्र

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra BJP | महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) निधी मिळत नसल्याचा आरोप शिंदे गटाकडून (Shinde Group) करण्यात आला होता. आता भाजपमध्ये (Maharashtra BJP) देखील अशीच धुसफूस सुरु असल्याचं समोर आलं आहे. आपलं पत्र नसताना दुसऱ्याच्या पत्रावर आपल्या मतादरसंघात निधी वाटप करण्यात आल्याने भाजप आमदाराने (BJP MLA) संताप व्यक्त केला आहे. निधी वाटपावरुन नाराज असलेल्या भाजप आमदाराने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा (MLA’s Resignation) देण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आर्वी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे (Maharashtra BJP) आमदार दादाराव केचे (MLA Dadarao Keche) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. कारंजा शहरासाठी नगर पंचायतीला दिलेला निधी आपल्याला विश्वासात न घेता दिला आहे. हा निधी आष्टी नगर पंचायत (Ashti Nagar Panchayat) आणि आर्वी नगर पालिकेला (Arvi Municipal Corporation) वळता करावा, अन्यथा आपण राजीनामा देणार असल्याचा इशारा दादाराव केचे यांनी फडणवीसांना दिला आहे. त्यामुळे वर्ध्याच्या राजकारणात आता दादाराव केचे आणि सुमित वानखेडे (Sumit Wankhede) यांच्यात नवा वाद सुरु झाला आहे.

पत्रात काय म्हटलं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हे मूळचे आर्वी येथील आहेत.
त्यांच्याच माध्यमातून कारंजा नगर पंचायतला (Karanja Nagar Panchayat) निधी देण्यात आला.
पण हा निधी देताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा दावा केचे यांनी केला आहे.
केचे यांनी फडणवीस यांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ते एवढ्यावरच थांबले नाही तर राजीनामा देणार असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

भाजपला आर्वीमध्ये वाढवण्यासाठी आपण आपलं आयुष्य खर्ची घातलं.
आता जर उपमुख्यमंत्र्यांचे पीए लुडबूड करत असतील तर तो आपल्या अस्तित्वाला धोका आहे,
आपण या प्रकारानं नाराज असल्याचे दादाराव केचे यांनी म्हटलं आहे. केचे यांनी पत्रातून आपली नाराजी
फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे.

Web Title : Maharashtra BJP | bjp mlas letter to devendra fadnavis regarding funds

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून 23 जणांची 43 लाखांची फसवणूक; क्लिक अँड ब्रश कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

ACB Trap News | बिल्डरकडून 2 लाखाची लाच घेणारा वरिष्ठ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Police Crime News | घोरपडे पेठेत क्रिकेट खेळणार्‍या युवकांनी सोनसाखळी चोरास पाठलाग करून पकडले; ACP सतीश गोवेकर, Sr PI संगीता यादव यांच्याकडून धाडसी तरूणांचा सत्कार