Maharashtra BJP | ‘नास्तिक शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी, ही कोणत्या प्रकारची नास्तिकता ?’, भाजपचा शरद पवारांवर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra BJP | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांना (Azaan On Loudspeaker) विरोध करत हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आज राज ठाकरे पुण्यात (Pune) आले असून उद्या हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात (Khalkar Chowk Maruti Mandir) महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. तर दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात (Sakhali Pir Talim at Rashtriya Maruti Mandir) राष्ट्रवादीकडून आज संध्याकाळी इफ्तार पार्टीचे (Iftar Party) आयोजन करण्यात आले आहे. यावरुन आता आणखी राजकारण तापण्याची शक्यता असून महाराष्ट्र बीजेपीने (Maharashtra BJP) राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर (General Secretary Ravindra Malwadkar) आणि भाई कात्रे यांनी या इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस (Shripad Sabnis) उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Pune City President Prashant Jagtap), शिक्षण महर्षी पी ए इनामदार (PA Inamdar), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (DCP Priyanka Narnaware), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर (ACP Satish Goyekar) उपस्थित राहणार आहेत.

 

 

ही कोणत्या प्रकारची नास्तिकता ?
नास्तिक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी होणार आहे. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे ? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रद्धेवर घाला आहे. राष्ट्रवादीचा जाहीर निषेध ! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा, असं ट्विट महाराष्ट्र भाजपने (Maharashtra BJP) केले आहे.

तसेच शरद पवारांनी त्यांच्या घरात मशिदीची स्थापना करुन, त्यांची इफ्तार पार्टीचं आयोजन करावं, हिंदूंच्या आस्थेवर घाला घालू नका. हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करता तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा !, असे आव्हान महाराष्ट्र भाजपने दिले आहे.

 

 

Web Title :- Maharashtra BJP | bjp tweet on ncp sharad pawar after iftar party organised in sakhlipir talim maruti mandir pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा