बाळासाहेब थोरातच करणार होते भाजपमध्ये प्रवेश, राधाकृष्ण विखेंचा मोठा गौप्यस्फोट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात आता पक्ष प्रवेशावरुन चांगलीच जुंपली आहे. बाळासाहेब थोरतांनी विखे पाटलांवर टीका केल्यानंतर आता विखे पाटलांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब थोरातच दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये येण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

राजकीय फायद्यासाठी थोरातांनी पक्षाची फरपड केली आणि पक्ष दावणीला बांधला, भाजपमध्ये येण्यासाठी ते कोणत्या नेत्यांना भेटले हे मला सांगण्याची गरज नाही अशा शब्दात विखेंनी थोरातांवर घणाघाती टीका केली. राज्यात तुम्हाला स्वताचा मतदारसंघ सोडला तर कुठेही यश मिळवता आलं नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाची चिंता करु नका असा टोलाही विखेंनी थोरातांना लगावला.

खरंतर अहमदनगरमध्ये सध्या बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे असा वाद पाहायला मिळत आहेत. त्यात भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नगर जिल्ह्यातील राजकारणात होणार संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे विखेंच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला होता. त्यावर विखेंनी पलटवार केला आहे.

जिथं गेला तिथं नांदा –

बाळासाहेब विखेंच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात विखे पाटलांना टोला लगावला आहे. जिथं गेला तिथं नांदा असा टोला बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला. तसेच विखे पाटलांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली का याची आपल्याला माहिती नाही असेही थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात आणि भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेसकडून मुंबईत रॅली काढण्यात आली. यावेळी थोरातांनी ही प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ऑगस्ट क्रांती मैदानात ध्वजारोहन करुन गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत भारत बचाओ – संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीएए आणि एनआरसीला समर्थन देणाऱ्या भाजपच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. याच ठिकाणाहून काँग्रेसचा स्थापना दिवसाचा मार्च काढण्यात आला.

विखेंचा खुलासा –
पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली असल्याचा आरोप विखेंनी केला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अशा अफवा पसरवून मला बदनाम करण्याची कोणीतरी सुपारी घेतली आहे. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. मग मी सार्वजनिक जीवनात कोणाहीली भेटायचे नाही का असा संतप्त सवाल विखेंनी उपस्थित केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/