Maharashtra BJP’s Explanation On Ayodhya Tour | राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याप्रकरणी महाराष्ट्र भाजपचे स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra BJP’s Explanation On Ayodhya Tour | पुण्यात झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा (Ayodhya Tour) स्थगित करण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले, आंदोलन होऊन 12 – 13 वर्ष झाली. आता जे उत्तर प्रदेश, बिहार बोलतंय त्यावेळी गप्प का बसला होता ? असा सवाल भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांना केला. याशिवाय, अयोध्या दौऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप करत या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्यामुळे अयोध्या दौरा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपनेच हा सापळा रचल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर सचिन सावंत यांचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Praveen Darekar) यांनी खोडून काढला आहे. ट्विटरवरून दरेकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. (Maharashtra BJP’s Explanation On Ayodhya Tour)

 

दरेकर म्हणाले, ”भाजपने राज ठाकरेंविरोधात सापळा रचलेला नाही किंवा तसे कारणही काही नाही. बृजभूषण सिंह यांचे ते वैयक्तिक मत होते. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) किंवा महाराष्ट्र (Maharashtra) भाजपकडून त्यावर अनधिकृत किंवा अधिकृत भूमिका आलेली नाही. त्यामुळे भाजपची जी हिंदुत्वाची विचारधारा आहे. त्याला साजेशी कोण भूमिका घेत असेल तर त्यांचे स्वागतच होईल.” असेही ते म्हणाले. (Maharashtra BJP’s Explanation On Ayodhya Tour)

दरम्यान, महाराष्ट्रात होणाऱ्या रेल्वे भरतीसाठी तेथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि तिथूनच सगळं सुरू झालं. असं ही राज ठाकरे म्हणाले होते.

 

तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय ?
एमआयएम वरही राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, एमआयएमची औलाद आमच्या महाराष्ट्रात येते औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात.
त्याबद्दल आम्हाला लाज शरम काही वाटत नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना औरंगजेब हा जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलायचं ? तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय ?, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra BJP’s Explanation On Ayodhya Tour | that is mp brijbhushans personal opinion about mns chief raj thackeray says bjp leader praveen darekar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा