Maharashtra Board 12th Result 2024 | प्रतिक्षा संपली, उद्या लागणार बारावीचा निकाल, असा पहा तुमचा निकाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Board 12th Result 2024 | राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी 1 वाजता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे लाखो विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. अखेर आज (सोमवार) राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.(Maharashtra Board 12th Result 2024)

सीबीएसई परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता लागली होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार मंगळवारी 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील 118 केंद्रांवर 52 हजार 780 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

निकाल कोठे पाहता येणार?

1) mahresult.nic.in
2) mahahsscboard.in
3) hsc.mahresults.org.in
4) hscresult.mkcl.org
5) results.gov.in.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Valvi | गुजरातच्या GST अधिकाऱ्याने महाबळेश्वरमध्ये खरेदी केली ६२० एकर जागा, संपूर्ण गावच विकत घेतल्याने खळबळ!

Monsoon Updates | गुडन्यूज! मान्सूनचे अंदमानमध्ये आगमन, ‘या’ तारखेला येणार महाराष्ट्रात

Shantigiri Maharaj | EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवली माहिती

Ebrahim Raisi Helicopter Crash | इराणच्या अध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघतात निधन, खराब हवामान आणि घनदाट धुक्यामुळे घडली दुर्घटना

Pune Crime News | पुणे : जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, तडीपार गुन्हेगाराला अटक