मंत्री एकनाथ शिंदे यांना 3 महिन्यानंतर पुन्हा मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 3 महिन्या नंतर पुन्हा जुन्या पदाची जबादारी सोपवण्यात आली आहे. कोरोनामुळे गडचिरोली पालकमंत्र्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली होती.

आजपासून पुन्हा एकनाथ शिंदे हेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने तसे पत्र प्रसिद्ध केलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे 15 एप्रिल रोजी वडेट्टीवार यांना गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची तात्पुरती अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.

परंतु आता नव्या आदेशाद्वारे गडचिरोलीचे पालकमंत्री पदाची अतिरिक्त कार्यभार वडट्टीवार यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे जुने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वडेट्टीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील. एकनाथ शिंदे हे गडचिरोली व्यतिरिक्त ठाण्याचे पालकमंत्री आहेत.