अर्थसंकल्प २०१८-२०१९ : पुण्यातील ‘शिवसृष्टी’करीता ‘एवढया’ कोटींची तरतूद, जाणून घ्या अर्थ संकल्पातील १० ठळक मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प २०१८-१९ विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पामध्ये पुण्यातील शिवस्मारकसृष्टीसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई- पुणे महामार्गावरील अंतर कमी करण्यासाठी ६ हजार ६९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये ४ हजार ६५० पोलीस पदांना मान्यता देण्यात आली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पातल्या १० मुख्य गोष्टी

१. राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळासाठी ६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. तर कृषी सिंचनासाठी २ हजार ७२० कोटी, जलसंपदा खात्यासाठी १२ हजार ५९७ कोटी, मृद आणि जलसंधारण विभागासाठी ३ हजार १८२ कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

२. २०१९-२० मध्ये २५ हजार शेततळी करण्याचे उद्दीष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. सुक्ष्म सिंचन अनुदानासाठी ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

३. शेतकरी कुटुंबाला कृषी अपघात विमा, चार कृषी विद्यापीठासाठी ६०० कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे वीमा योजनेत सुधारणा.

४. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

५. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची घोषणा.

६. सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटीची तरतूद. श्रावणबाळ योजना ६०० रुपये वरून १००० रुपये वाढ

७. मान्सून कलावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस प्रयोगास मान्यता.

८.एसटी महामंडळ बसस्थानकसाठी १३६ कोटींची तरतूद. सामाजिक न्यायासाठी १२ हजार कोटींची तरतूद.

९. तीर्थक्षेत्रांच्या नुतनीकरणासाठी १०० कोटीची तरतूद. विधवा, घटस्फोट महिलांसाठी स्वयंरोजगार योजनेसाठी २०० कोटीची तरतूद.

१०. जेजे आर्ट स्कूल परिसरासाठी १५० कोटींची तरतूद.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

म्हणून ३५ वयानंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ तपासण्या

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जेलीफिशचा धोका ! रूग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची मागणी

सिनेजगत

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून