शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! नियमितपणे कर्जफेड करणार्‍यांना राज्य सरकारची मोठी ‘भेट’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्र बजेट २०२० विधानसभेत सादर झाले असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण बाबी अधोरेखित केल्या. महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवलं आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करत, नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

बजेट सादर करताना उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत टोला लगावला. हरिवंशराय बच्चन यांच्या दोन पंक्ती त्यांनी यावेळी सभागृहात म्हणून दाखवल्या.
असफलता एक चुनौती है, उसे स्विकार करो
क्या कमी रह गयी, देखो और सुधार करो

तसेच १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जून २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास, त्या शेतकऱ्यांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पिककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येईल. तसेच, ही रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.

पुछ अगले बरस मे क्या होगा,
मुझसे पिछले बरस की बात न कर
ये बता हाल क्या लाखों का,
मुझसे दो-चार-दस की बात न कर…
असा शेअर म्हणत अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित आमदारांची दाद मिळवली.