Maharashtra Budget 2021 : अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प, जाणून घ्या महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज (सोमवार) विधानसभेत सादर केला. कोरोनामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून या अर्थसंकल्पात सरकार काय देणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करतना शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये तीन लाखापर्यंत पिक कर्ज घेणाऱ्या नियमित वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बीनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षासाठी 2 हजार कोटींची घोषणा केली. याशिवाय आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

1. कर्जमुक्तीनंतर 42 हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं.
2. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटींचा महावितरणला निधी
3. विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी
4. कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना प्रत्येक वर्षी 200 कोटींची तरतूद
5. आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद
6. सरकारी रुग्णालयात आग रोधक उपकरणे लावण्यात येणार
7. सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
8. शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले आहे. अशांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार, कर्जाचे व्याज सरकार भरणार
9. कोरोना काळात औद्योगिक घट झाली. मात्र बळीराजाने तारले. शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्याचा सरकारचा प्रयत्न
10. जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांसाठी 12 हजार 919 कोटींचा निधी
11. जलसंधारण विभागासाठी 2 हजार 60 कोटींचा निधी प्रस्तावित
12. पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लगाणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल
13. पूर्व द्रूतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव
14. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेली रेवस-रेडी मार्गासाठी 9573 कोटींचा खर्च अपेक्षित
15. गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 कोटींची तरतूद
16. महत्त्वाच्या 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी
17. ग्रामविकास विभागासाठी 7350 कोटींचा निधी प्रस्तावित
18. निसर्ग चक्रीवादळ आणि राज्यातील आपत्ती पाहून महामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तुकडी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी
19. पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16 हजार 139 कोटी मंजूर
20. नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार
21. एसटी महामंडळासाठी 1400 कोटी रुपयांची घोषणा
22. ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार
23. महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार
24. नांदेड ते जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
25. अहमदनगर, बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार
26. गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी
27. समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे रोजी खुला करणार