Maharashtra Budget 2022 | यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळालं?; वाचा एका क्लिकवर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2022 | ठाकरे सरकारने (Thackeray Government) आपला तिसरा अर्थसंकल्प मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आर्थिक वर्ष 2022 – 23 चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) विधीमंडळात सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी (Agricultural sector) कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

 

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या घोषणा –

नियमित कर्ज फेडणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांसाठी 2022 – 23 ला 10 हजार कोटींची तरतूद देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या अनुदानात 50 टक्के वाढ करून 75 हजार रूपये तर शून्य टक्के दराने पीक कर्ज योजनेमुळे (Crop loan scheme) वाटपात वाढ करण्यात येणार आहे.

 

वसई, हिंगोलीतील हळद संशोधन केंद्राला (Turmeric Research Center) 100 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शाश्वत विकास योजनेमध्ये शेततळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांना (Women farmers) 50 टक्के तरतूद आणि 3 टक्के निधी माजी सैनिकांना देण्यात येणार आहे. हिंगोलीमध्ये (Hingoli) बाळासाहेब कृषी संशोधन केंद्र (Balasaheb Agricultural Research Center) उभारण्यात येणार असल्याचीही घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

 

गेल्या वर्षी नियमित वीज बील ( भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान घोषीत केले पण लागू करता आले नाही. ते या वर्षापासून सुरू करणार (Electricity bill) असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच सुदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या प्रयोगशाळा (Laboratory) उभारणार आणि प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्पाची (Goat Project) घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

 

दरम्यान, कोकण (Konkan) आणि परभणीमधील (Parbhani) प्रत्येत कृषी विद्यापीठाला (University of Agriculture) प्रत्येकी 50 कोटी रूपयांची घोषणाही करण्यात आली आहे.
आजच्या अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की,
यंदाचा अर्थसंकल्प राज्याच्या हिताचा आणि विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प आहे.

 

Web Title :- Maharashtra Budget 2022 | maharashtra budget 2022 23 see ajit pawar what announced for agriculture sector

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा