Maharashtra Budget 2023 | महिलांसाठी आनंदाची बातमी! आता महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2023 | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) आहे.

सारे काही महिलांसाठी…महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट

– राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) बस सेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
– कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
– मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
– महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
– माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

– आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
– गटप्रवर्तक यांचे मानधन 4700 वरून 6200 रुपये
– अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
– मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
– अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
– अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
– अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना

– शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
– अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
– या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
– या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार

‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

– मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
– पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
– जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
– पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
– अकरावीत 8000 रुपये
– मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

 

 

Web Title :  Maharashtra Budget 2023 | Good news for women! Now women get 50 percent discount on ST travel; Big announcement by Devendra Fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ajit Pawar | ‘डीजीआयपीआर’मधील 500 कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न ;विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप

Maharashtra Budget 2023 | धनगर समाजासाठी मोठी घोषणा ! समाजाला 1000 कोटी रुपये, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज