Maharashtra Budget 2023 | राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांच्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा 2023 आणि 2024 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहे. दरम्यान यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असल्याची टीका केली आहे. तसेच अर्थसंकल्पामुळे आमचा भ्रमनिरास झाल्याचे अजित पवार म्हणाले.

फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे ‘गाजर हलवा’ – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीने आपल्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) जे मुद्दे मांडले होते, त्याच मुद्यांवर आजचा अर्थसंकल्प आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर एकही माणूस पंचनामे करण्यासाठी गेला नाही. अजूनही काही गोष्टी मला समजल्या आहेत. अवकाळी पावसाप्रमाणे आज मुंबईत गडगडाट झाला. पण गरजेल तो बरसेल का असा सध्याचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे हा ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

शेवटचे बजेट असल्याच्या अविर्भावात…- जयंत पाटील

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी कौतुक केले तर विरोधकांनी टीका केल्या. राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले, हे बजेट शेवटचे असल्याच्या अविर्भावात मांडलं आहे. जेवढ्या कल्पना असतील तेवढ्या सगळ्यांचा उल्लेख या बजेटमध्ये केला आहे. प्रोव्हीजन यात मर्यादित आहेत. पीडब्लूडीला एक हजार कोटी कमी दिले आहेत. पर्य़ावरणाला आम्ही दिले त्यापेक्षा कमी पैसे दिले आहेत. म्हणजे भाषण उत्तम होते, पण प्रोव्हीजन आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.

हा अर्थसंकल्प अर्थहिन व दिशाभूल करणारा- नाना पटोले

अर्थसंकल्पावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्षात काहीच नाही. हा अर्थसंकल्प केवळ मोठं-मोठ्या आकड्यांची घोषणा आहे. या अर्थसंकल्पात शेतमालाच्या हमी भावाबद्दल काहीच नाही.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल काहीच घोषणा केली नाही.
तसेच जुन्या पेन्शनबद्दलही कोणते सुतोवाच केले नाही.
हा अर्थसंकल्प अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा असून अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला – राजू शेट्टी

राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पामध्ये खोली कमी आणि उथळपणा जास्त असेच वर्णन या अर्थसंकल्पाचे करावे लागेल, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे. धान उत्पादन शेतकऱ्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला सारखं असल्याची टीका केली आहे. तेवढ्यापुरतं चविष्ट वाटतं. परंतु, अंतिमत: हाताला काहीच लागत नाही अशी स्थिती एकूण या बजेटची असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

पुण्याच्या तोंडाला पाने पुसली – आमदार सुनील टिंगरे

मुंबई पाठोपाठ राज्यातील सर्वाधिक महसूल पुणे शहरातून जमा होतो. मात्र,
राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पुरंदर विमानतळ
(Purandar Airport), रिंग रोड (Ring Road), पुणे मेट्रोतील (Pune Metro)
न Pune Metroवीन मार्ग यांनाही पुरेशा निधीची तरतूद न करता केवळ वाटण्याच्या अक्षता
दाखविन्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गत वर्षी सादर केलेल्या अनेक योजनांची नावे
बदलून त्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरावर अन्यायकारक असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी दिली.

Web Title : Maharashtra Budget 2023 | Reactions of the opposition on the state budget, who said what ?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी प्राईड अवार्डने सन्मान

Kolhapur ACB Trap | स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी, सी.पी.आर. हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात