अजित पवारांनी मांडला राज्याच्या तिजोरीचा ‘लेखाजोखा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. त्या अगोदर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशना दरम्यान आर्थिक पाहणी अहवाल सादर केला गेला. महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नामध्ये १ लाख ५६ हजार कोटींची तूट झाली आहे. तर २०२०-२१ च्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये पूर्वीच्या संख्यानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत उणे ८ टक्के वाढ तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे ८ टक्के वाढ अपेक्षित दाखवण्यात आली आहे. तर कृषी आणि संलग्न क्षेत्रात ११.७ टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योगामध्ये उणे ११.३ टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे ९ टक्के वाढ दाखवली आहे.

दरम्यान, पहिल्या असलेल्या सुधारित अंदाजानुसार, २०१९-२० चे सांकेतिक स्थूल उत्पन्न २८.१८,५५५ कोटी इतके होते तर २०१८-१९ मध्ये हे उत्पन्न २५,१९, ६२८ कोटी होते. २०१९-२० मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्त्पन्न २१,३४,०६५ कोटी होते. तसेच २०१८-१९ मध्ये २०,३३, ३१४ कोटी होते. २०१९-२० रोजी राज्याचे दरडोई उत्पन्न २,०२,१३० कोटी होते तर २०१८-१९ मध्ये १,८७,०१८ कोटी होते. तसेच २०१९-२० या वर्षीच्या तुलनेत २०२०-२१ च्या सांकेतिक स्थळ राज्य उत्पन्नात १,५६,९२५ कोटी घट अपेक्षित आहे. २०२०-२१ मधील दरडोई राज्याचे उत्पन्न १,८८,७८४ अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, महसुली जमा ३,४७,४५७ कोटी तसेच वर्ष २०१९-२० या सुधारित अंदाजानुसार ३,०९,८८१ कोटी आहे.

तसेच २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय पाहणी अहवालाच्या अंदाजानुसार कर महसूल २,७३,१८१ कोटी आणि करेतर महसूल ७४,२७६ कोटी आहे. २०२० मध्ये एप्रिल ते डिसेंबर या दरम्यान प्रत्यक्ष महसुली जमा १,७६,४५० कोटी एवढया अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ५०.८ टक्के आहे. तर २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महाराष्ट्र राज्याचा महसुली खर्च ३,५६,९६८ कोटी असून, २०१९-२० मध्ये सुधारित अंदाजानुसार ३,४१,२२४ कोटी आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे २० जुन २०१९ अखेर ५३.०४ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली गेली. तसेच २०१९-२० मध्ये प्रत्यक्ष सिचन क्षेत्र ४०.५२ लाख हेक्टर एवढे होते.

तसेच २०२०-२१ डिसेंबर अखेर वित्तीय संस्थेद्वारे ४० हजार ५१५ कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाले. तर मागील वर्षी ते २८ हजार ६०४ कोटी इतकं होतं. तर या २०२० सप्टेंबर अखेर ३० हजार १४ कोटी रुपये कृषी मुदत कर्ज वाटप करण्यात आले तर २०१९-२० मध्ये ३४ हजार ४२७ कोटी इतका होता. तर पशुसंवर्धन क्षेत्रात ४.४ टक्के वाढ अपेक्षित असून वने आणि लाकूड तोडणी ५.७ टक्के वाढ अपेक्षित आहे. आणि मत्स व्यवसाय आणि मत्स शेती २.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. वस्तू निर्माण उणे ११.८ टक्के, बांधकाम उणे १४.६ टक्के त्याचा परिमाण उद्योग क्षेतात उणे ११.३ टक्के वाढ अपेक्षित आहे.

२०१९-२० मध्ये शेतकऱ्यांना एकूण १०८९८ कोटी कर्ज दिले. जून ते ऑक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाल्यामुळे, पीडित शेतकऱ्यांना कमाल २ हेक्टर क्षेत्रातीतील शेतपिकांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये फळ पिकांसाठी २५ हजार प्रति हेक्टर या दराने दोन हफ्तात ४ हजार ३७४.४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच राज्यातील परदेशी गुंतवणूक एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२० थेट परदेशी गुंतवणूक ८,१८,५२२ कोटी एवढी झाली आहे.