Maharashtra Budget Session 2023 | शिवसेनेनं बजावला 55 आमदारांना व्हीप, भास्कर जाधवांचे टीकास्त्र म्हणाले- ‘अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget Session 2023 | शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षाला मिळाले. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निर्णयानंतर ठाकरे गटाची अडचण वाढली आहे. शिवसेनेनं अधिवेशन काळात आमदारांनी हजर राहण्यासाठी व्हीप (Whip) बजावला आहे. सर्व 55 आमदारांना हा व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेच्या आमदारांना अधिवेशन काळात (Maharashtra Budget Session 2023) हजर राहण्यासाठी व्हीप बजावला असला तरी आम्ही त्याला भीक घालत नाही असे टीकास्त्र आमदार भास्कर जाधवांनी (MLA Bhaskar Jadhav) शिंदे गटावर सोडलं आहे.

55 आमदारांना व्हीप

शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले (Shivsena Pratod Bharat Gogawale) म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांना अधिवेशन काळात (Maharashtra Budget Session 2023) हजर राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. सर्व 55 आमदारांना हा व्हीप बजावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कारवाई करु नये, असं निर्देश दिले आहेत. पण, अधिवेशनाला हजर राहण ही कारवाई होत नाही. हा व्हीप आहे की सर्वांनी सभागृहात हजर राहावं.

काय म्हणाले भास्कर जाधव?

विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, आशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही. आमचं मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची सुरक्षा काढली, अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही, तर त्यांच्या व्हीपला आम्ही कसे घाबरणार? असे अनेक व्हीप आम्ही पाहिले आणि गेले, असे जाधव म्हणाले.

ते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत

भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांनी म्हटले की,
आमच्या उपस्थितीसंदर्भात जो व्हीप बजावायचा, तो आम्ही बजावणार आहे.
ते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत. शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे की,
कोणताही व्हीप बजावणार नाही. न्यायालयाला सांगितले असताना व्हीप बजावत असतील तर आम्ही पुन्हा
सर्वोच्च न्यायालयात जाऊ. न्यायालयाचा अवमान त्यांनी केला आहे.
न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असे प्रभू यांनी म्हटले.

Web Title :-    Maharashtra Budget Session 2023 | bhaskar jadhav reaction on shinde group whip issue to shivsena mla

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Ranbir Kapoor | रणबीर कपूर सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये नाही तर ‘या’ दिग्गज गायकाच्या बायोपिक मध्ये झळकणार; अभिनेत्याने केला खुलासा