Maharashtra Budget Session 2023 | गळ्यात कांद्याची माळ, डोक्यावर टोपली; विधिमंडळाबाहेर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget Session 2023 | मागील काही दिवसांपासून राज्यातील घाऊक बाजारात (Wholesale Market) कांद्याचे दर (Onion Rate) गडगडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. अलीकडेच पाचशे किलो कांदा विकून शेतकऱ्याला सगळा खर्च वसूल करुन व्यापाऱ्याने अवघे दोन रुपये हातावर ठेवले होते. असेच अनेक प्रकार इतर भागात घडत असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करणारे शेतकऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या असंतोषाचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2023) उमटले. राष्ट्रवादीसह (NCP) विरोधी पक्षांच्या आमदारांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून जोरदार घोषणाबाजी केली.

कांद्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन (Agitation) केले. शेतकरी विरोधी सरकारचा विरोध असो, असे बॅनर यावेळी विरोधकांनी झळकावले. तसेच ‘कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कांदा खरेदी केंद्रे सुरु झालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या. तर पायऱ्यांवर निदर्शने करणाऱ्या पक्षाच्या आमदारांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना कांद्याची माळ दिली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session 2023) दुसऱ्या दिवशी विरोधक कांद्याच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यातील झाडी बोरगांव येथील एका शेतकऱ्याने कांदा विकल्यानंतर केवळ एक रुपयांचा चेक आडत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला देण्यात आला होता. संबंधित व्यापाऱ्यावर बाजार समितीने कारवाई केली आहे. परंतु हा मुद्दा राज्यभरात गाजला, त्यानंतर विरोधकांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित करत, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गळ्यात माळा आणि पाटीत कांदा आणून आंदोलन केले.

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे.
आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे.
नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे.
२.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल .
कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही.
त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title :-Maharashtra Budget Session 2023 | onion and cotton price down opposition leaders agitation at vidhanbhavan stairs mumbai know in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | शासकीय अधिकारी तरुणीवर ओळखीतून केला अत्याचार; अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार

Jalgaon Crime News | मुलाच्या डोळ्यादेखत जन्मदात्या बापाने सोडला जीव

Sachin Tendulkar | वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा उभारणार पुतळा; मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय