Maharashtra Budget Session 2024 | अर्थसंकल्पात अजित पवारांच्या महत्वाच्या घोषणा, अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन, शेतकऱ्यांसाठी…

मुंबई : Maharashtra Budget Session 2024 | अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच आगामी आर्थिक वर्षासाठी करावायच्या आर्थिक तरतुदी, वेगवेगळ्या योजनांचा विकास, विस्तारासाठी प्रस्तावित निधी याबाबत सभागृहाला माहिती दिली. अयोध्या आणि श्रीनगरमध्ये राज्य सरकार महाराष्ट्र भवन बांधणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या मांडलेले शेतीविषयक तरतूदी आणि घोषणा –

 • सन २०३० पर्यंत एकूण उर्जानिर्मितीपैकी ४० टक्के उर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचा उद्देश. राज्यात रुफ टॉप सोलर योजना राबवणार. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलार पॅनल बसवण्यासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देणार. नागरिकांना यातून ३०० युनिट वीज मोफत मिळणार.
 • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत ७ हजार मेगावॅट सौरउर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याचे नियोजन. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही नवी योजना सुरू करणार. यामध्ये ८ लाख ५० हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येतील. पीएम कुसूम योजनेअंतर्गत राज्यात या वर्षी १ लाख सौरपंप स्थापण्याचा उद्दीष्ट. ७८ हजार ७५७ पंप आतापर्यंत कार्यान्वित.
 • वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यात झिरेवाडी येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया उपकेंद्र शासकीय कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता.
 • अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करणार.
 • जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत ५७०० गावांना १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजुरी. ३८९ कामे पूर्ण.
 • सन २०२४-२५ या वर्षासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास २४५ कोटी. वनविभागास २५०७ कोटी आणि मृद व जलसंधारण विभागास ४२४७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित.
 • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुपंनासाठी अनुदान देणार.
 • राष्ट्रीय पशुधन अभियानअंतर्गत शेळी, मेंढी, वराह, कुक्कुट योजनेचा लाभ शेतकरी व पशूपालकांना मिळावा यासाठी १२९ प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवला.
 • सन २०२४-२५ या वर्षासाठी कृषी विभागास ३ हजार ६५० कोटी, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागास ५५५ कोटी व फलोत्पादन विभागास ७०८ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित.

अर्थसंकल्पातील इतर महत्वाच्या घोषणा –

 • अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७७ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे
 • छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून त्यांचं तिथे स्मारक केलं जाणार.
 • राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजारांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे
 • महिलांना ‘पिंक रिक्षा’ उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे
 • अर्थ विभागासाठी २०८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
 • विधी व न्याय विभागासाठी ७५९ कोटी, गृह-पोलीस विभागास २२३७ कोटी तर उत्पादन शुल्क विभागास १५३ कोटींचा निधी प्रस्तावित
 • सांस्कृतिक कार्य विभागासाठी ११८६ कोटी, पर्यटन विभागाला १९७३ कोटी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाला १३६७ कोटी तर महसूल विभागाला ४७४ कोटींचा निधी प्रस्तावित
 • वरळीत आधुनिक कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार
 • क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतूद
 • आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत १० पट वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी १ कोटी, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येतील
 • गृहनिर्माण विभागासाठी १३४७ कोटी, दिव्यांग कल्याण विभागास १५२६ कोटी, कामगार विभागास १७१ कोटी रुपये तर अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास ५२६ कोटींचा निधी प्रस्तावित
 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान २ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय
 • बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार
 • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी १८ हजार ८१६ कोटींचा निधी प्रस्तावित
 • बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था – आर्टी स्थापन केली जाणार आहे
 • आदिवासी विकास विभागासाठी १५ हजार ३६० कोटींचा निधी प्रस्तावित
 • अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य १ हजार रुपयांवरून १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे
 • गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळामार्फत उसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे
 • महिला व बाल कल्याण विकास विभागास ३१०७ कोटी रुपयांची तरतूद
 • विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद
 • राज्यात सध्या २०० सिंचन प्रकल्पांची कामं चालू
 • मदत व पुनर्वस प्रकल्पासाठी ६६८ कोटी रुपयांची तरतूद
 • ऊर्जा विभागासाठी ११ हजार ९३४ कोटींच्या निधीची तरतूद
 • राज्य सरकारचं ७ हजार मेगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य
 • वीज उपलब्ध नसलेल्या ३७ हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येतील
 • केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी १५५५४ कोटींची तरतूद
 • पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास ३८७५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
 • उद्योग विभागास १ हजार ०२१ कोटी तर सहकार विभागास १९५२ कोटींच्या निधीची तरतूद
 • मूर्तीजापूर-यवतमाळ रेल्वेमार्ग विस्तारीकरणासाठी ५० टक्के निधी
 • ग्रामविकास विभागास ९२८० कोटी रुपये. गृह, परिवनहन, बंदरे विभागास – ४०९४ कोटी रुपये. सामान्य प्रशासन विभागास १४३२ कोटी रुपयांची तरतूद.
 • नवी मुंबई विमानतळ पहिला टप्पा मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित होईल

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chakan Murder Case | चाकणमध्ये अल्पवयीन मित्राचा खून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन अल्पवयीन ताब्यात

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका