Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget Session | राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सध्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर चर्चा सुरु असताना राजकीय मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच सांगलीतील एका प्रकारामुळे दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. हा मुद्दा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) देखील उपस्थित करण्यात आला. यावरुन अजित पवार (Ajit Pawar), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), नाना पटोले (Nana Patole) या विरोधी पक्षातील ज्येष्ठ सदस्यांनी सरकारला जाब विचारला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. मात्र, या प्रकारामुळे विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली.

सांगलीत शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदीच्या आधी त्याची जात कोणती हे विचारले जात आहे. खताची खरेदी करताना जात सांगण्याची गरज काय (Sangli Caste Issue) हे सरकारने स्पष्ट करायला हवे. आम्ही विचारले तर सांगितले की सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे. त्यात जातीचा रकाना नव्याने टाकला आहे. तो भरल्याशिवाय खत खरेदीची प्रक्रिया पुढे जात नाही. जातीचे लेबल पुरोगामी विचारांच्या माहाराष्ट्रात चिटकवण्याचा प्रयत्न सरकारने करता कामा नये, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. (Maharashtra Budget Session)

नाना पटोले संतप्त

यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विरोधक राईचा पर्वत करत असल्याचे म्हटले.
मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आमदार नाना पटोले चांगलेच संतप्त झाले.
‘मुनगंटीवार म्हणाले की राईचा पर्वत केला जातोय. त्यांनी मान्य केलंय की केंद्रानं तसे आदेश दिले,
त्यात आम्ही सुधारणा करतोय. खत घेण्यासाठी शेतकऱ्याची जात विचारली जातेय आणि मंत्री म्हणतायत की तुम्ही राईचा पर्वत करताय. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे’, असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्याचं विरोधकांना उत्तर

सांगलीतील जात प्रकरणावरुन खडाजंगी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत उत्तर दिलं.
ते केंद्र सरकारचं पोर्टल आहे. आपण केंद्राला जातीचा रकाना वगळण्यात यावा असं कळवत आहोत,
असं म्हणत या चर्चेव पडदा पडला. नाना पटोलेंचा राग आपण समजू शकतो की काल शेतकऱ्यांच्या बाबतीत
आपण जे सकारात्मक निर्णय घेतले त्यामुळे विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला.
त्यामुळे त्यांच्याकडे काही राहिले नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना लगावला.

Web Title : Maharashtra Budget Session | cm eknath shinde replied maha vikas aghadi leaders over sangli caste issue at maharashtra budget session assembly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई