CAA वरून PM मोदींवर ‘घसरला’ जिग्नेश मेवाणी, सांगितली ‘त्यांची’ राहिलेली 3 ‘स्वप्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीएएच्या विरोधात देशात सुरु असलेल्या प्रदर्शनादरम्यान गुरुवारी महाराष्ट्रात पुण्यात सर्व पक्षीय सभा पार पडली. पुण्याच्या सारसबाग परिसरात संविधान बचाओ मंच आणि जमात ए तंजीम कडून ही रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यात जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते.

जिग्नेश मेवाणीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत आरोप केला की, मोदींनी हॉटेलपर्यंत पोलीस पाठवून एका गुजराती महिलेवर लक्ष ठेवले होते. हे त्याचे चरित्र आहे. यावेळी जिग्नेश मेवाणी याने शाहीनबागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा केली आणि पीएम मोदींना याबाबत काही बोलण्यापूर्वी स्वत:ला आरशात बघण्याचा सल्ला दिला.

जिग्नेश मेवाणी म्हणाला की, पीएम मोदींचे तीन स्वप्न आहेत. त्यांचे पहिले स्वप्न आहे की देश लूटने आणि राहिली साहिली संपत्ती आपल्या नावे करणे, दुसरे आयुष्यभर सत्तेत राहणे आणि तिसरं स्वप्न 8 वी च्या वर्गात यांच्यावरील धडा अभ्यासक्रमात आणणे. मेवाणी म्हणाले की, देशातील महिलांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे आणि असे सरकार आणावे जे पाणी, शिक्षण आणि आरोग्याची सेवा मोफत देईल.

मेवाणी यांनी पीएम मोदी यांनी आपली डिग्री दाखवावी असे देखील आव्हान दिले. आणि सीएएवर समाज तोडण्याचा आरोप लावला. गांधीजींच्या असहयोग आंदोलनाच्या धर्तीवर आव्हान केले आणि अल्पसंख्यांकांना सरकारी अधिकाऱ्यांना कागद दाखवण्यास सांगितले तर संविधान दाखवा असे आवाहन केले.

संघ प्रमुखांवर आव्हाडांची टीका –
जितेंद्र आव्हाड यांनी संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड म्हणाले की, ही लढाई फक्त मुसलमनांची नाही, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. आव्हाडने आसाममध्ये डिटेंशन सेंटरमध्ये राहणाऱ्या लोकांना सोडण्याची मागणी केली आणि सांगितले की मी मोहन भागवत यांना प्रश्न विचारतो की, 14 लाख हिंदुंबाबत तुमचा हेतू काय आहे. तुम्ही जगाला समजू देऊ इच्छित नाही की आसाममध्ये काय होत आहे.

ते म्हणाले की, 50 वर्षापासून आसामध्ये लोक एकत्र राहत आहे. परंतु आता त्याला पीएम मोदी आणि अमित शाह यांची नजर लागली आहे. सीएएमुळे देशातील मुस्लिम धोक्यात आहेत. आव्हाड म्हणाले की, पीएम मोदी आणि अमित शाह यांनी हिंदु आणि मुसलमान यांच्यात फूट पाडल्याचा आरोप लावत म्हणाले की ही भिंत तुटताना दिसत आहे. हिंदू मुस्लीम यांना माहित आहे की 1927 मध्ये जाळण्यात आलेली मनुस्मृती पुन्हा आणू इच्छित आहेत परंतु आम्ही हे होऊ देणार नाही.

गोडसे सर्वात मोठा दहशतवादी –
आव्हाड म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे सर्वात मोठा दहशतवादी आहे, महाराष्ट्राच्या नावे ते कलंक आहेत. सीएए विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की लढा यासाठी आहे की देश आंबेडकरांना स्वीकारेल की गोळवलकरांना. आव्हाड यांनी संविधान खरेदी करण्याचे आव्हान केले आणि सावरकरांचे नाव न घेता त्यांची वादग्रस्त कविता वाचून दाखवली.