Maharashtra Cabinet Decision | निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाखांच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता

0
162
Maharashtra Cabinet Decision | 3 thousand 976 crore 83 lakhs revised administrative approval for Nira Deoghar Irrigation Project
file photo

पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सिंचनास लाभ

 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे पुण्यासह, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातील ४३ हजार ५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. (Maharashtra Cabinet Decision)

 

निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देवघर येथे कृष्णा खोऱ्यातील भीमा उप खोऱ्यातील निरा नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. सन 2008 पासुन धरणामध्ये पूर्णक्षमतेने 337.39 दलघमी इतका पाणी साठा होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत “उर्वरीत महाराष्ट्र” या प्रदेशात आहे. या प्रकल्पामुळे भोर तालुक्यातील 6 हजार 670 हेक्टर, सातारा जिल्हातील अवर्षण प्रवण खंडाळा तालुक्यातील 11 हजार 860 हेक्टर व फलटण तालुक्यातील 13 हजार 550 हेक्टर तसेच सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्यातील 10 हजार 970 हेक्टर असे एकूण 43 हजार 50 हेक्टर क्षेत्रास प्रवाही व उपसा पद्धतीने सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. (Maharashtra Cabinet Decision)

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | 3 thousand 976 crore 83 lakhs revised administrative approval for Nira Deoghar Irrigation Project

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन

Rubina Dilaik | साईड कट गाऊनमध्ये रुबीना दिलैकने दाखवली किलर स्टाईल; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अवतारने चाहते घायाळ

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ

Pune Bypoll Elections | पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी अजित पवारांनी धुडकावली, महाविकास आघाडी निवडणूक लढवणार; अजित पवारांनी केलं स्पष्ट