मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (दि.16) पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मोठ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) मोठा निर्णय घेण्यात आला असून संबंधित विभागाला तसे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला (Relief and Rehabilitation Department) दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळणार आहे. (Maharashtra Cabinet Decision)
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाला दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
आयटीआय (ITI) कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25 हजार रुपये करण्यात आले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागासाठी (Skill, Employment, Entrepreneurship Department) हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय (Veterinary Medicine College) मंजूर करण्यात आले आहे.
याशिवाय इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Web Title : Maharashtra Cabinet Decision | decision of state cabinet meeting incessant rain is declared as a natural calamity
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Politics News | ‘फडणवीसांची काहीतरी मजबूरी दिसतेय’, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरुन ठाकरे गटाचा टोला
- WhatsApp New Feature | WhatsApp ने आणले नवे भन्नाट ‘चॅट लॉक फिचर’
- Chandrakant Patil | ‘या’ चुकीमुळे पुणेकरांना चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची होतेये गळती, पालकमंत्र्यांचा खुलासा