Maharashtra Cabinet Decisions | राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decisions |  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. शिंदे सरकारने (Shinde Govt) सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई हप्त्यात (DA) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या (Central Govt) धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरुन 34 टक्के होणार आहे.

 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

परिवहन विभाग

पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrut Mahotsav) वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. (Maharashtra Cabinet Decisions)

 

वैद्यकीय शिक्षण विभाग

  • वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GeM) पोर्टलद्वारे

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून  करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.

 

दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखाचे विमा संरक्षण
गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे  प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सन 2022 प्रस्तावित विधेयके व अध्यादेश

 

प्रस्तावित विधेयके – ९

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश – ६

१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२.

 

प्रस्तावित विधेयके – ९

१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२.

२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२.

३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२.

४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२२.

५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२.

६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२.

७) महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२२.

८) महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२२.

९) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकार व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ (बाजार समित्यांमध्ये
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्यासाठी समितीच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समितीवर त्यांचे प्रतिनिधी निवडून देण्याबाबतची तरतूद करणेबाबत.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | Good news for state government employees! Increase in dearness allowance by 3 percent on central government lines

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Monsoon Session | उद्धव ठाकरेंची खेळी ! पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांना व्हिप जारी

 

Bank Jobs 2022 | बँकांमध्ये 6000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज; ‘ही’ आहे शेवटची तारीख

 

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाचा पोर्टफोलिओवर परिणाम, खुले होताच कोसळले ‘हे’ स्टॉक्स