Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, एक रुपयात मिळणार पीक विमा, अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Decision) मंगळवारी (दि.30) पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. केंद्र सरकारच्या (Central Government) पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) मंजुरी देण्यात आली.

तसेच फक्त एक रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) या अर्थसंकल्पातील घोषणेला देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेला (Dr. Panjabrao Deshmukh Natural Farming Mission Scheme) मुदतवाढ देण्यात आली असून ही योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra Cabinet Decision)

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

– कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.
– केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.
– ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.
– सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता.

– महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण.
– राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार.
– कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार.
– सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार.
– बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय.
– अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार.
– नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता.

Web Title : Maharashtra Cabinet Decision | maharashtra cabinet decision farmers crops are covered in 1 rs insurance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MHT-CET Result 2023 | येत्या जून महिन्यात होणार MHT-CET चा निकाल जाहीर; रिजल्ट पाहण्यासाठी या स्टेप करा फॉलो

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा खुलासा, म्हणाले-‘…म्हणून शिवतीर्थावर गेलो होतो’ (व्हिडिओ)

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन बनला राज्याचा ‘स्माइल ॲम्बेसेडर’; व्यसनांविरोधात करणार जनजागृती