Maharashtra Cabinet Decision | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! पूरग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 13, 600 रुपये मिळणार, निकषापेक्षा दुप्पट पैसे देण्याचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) आजच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवण्यात आली असून एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला (Maharashtra Cabinet Decision) आहे. तसेच दुसरा निर्णय मुंबई मेट्रो संदर्भात घेण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून काही ठिकाणी आणखी पंचनामे सुरु आहेत.

 

आतापर्यंत राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढून तीन हेक्टर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल. (Maharashtra Cabinet Decision)

 

एनडीआरफच्या निकषानुसार, शेतकर्‍यांना हेक्टरी 6 हजार 800 रुपये मिळतात. याच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. आता शेतकर्‍यांना 13, 600 रुपये मिळतील.

मुंबई मेट्रोबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली
की, कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रकल्पाचा मूळ खर्च 23 हजार 136 कोटी होता तो आता 33 हजार 405 कोटी 82 लाख रुपयांचा होईल.

 

प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे.
सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या वाट्याची रक्कम 2 हजार 402 कोटी 7 लाख वरुन 3 हजार 699 कोटी 81 लाख एवढी होत आहे.
त्यामुळे राज्याच्या समभागापोटी 1 हजार 297 कोटी 74 लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास
प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेल्वेला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

 

या सुधारित वित्तीय आराखडयानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे (जायका) कर्ज 13 हजार 235 कोटीवरून
19 हजार 924 कोटी 34 लाख इतके झाले असून वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | maharashtra cabinet decision taken today farmers relief fund eknath shinde maharashtra cabinet decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

 

RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू