Maharashtra Cabinet Decision | मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणाला 3 हजार कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | तौक्ते निसर्गवादळ तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) मोठा निर्णय घेतला आहे. चक्रीवादळाचा (Cyclone) बंदोबस्त करण्यासाठी तसेच कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.

कोकणातील (Konkan) जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तींशी सामना करता यावा तसेच आपत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करता यावा यासाठी राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा निधी कोकणाला दिला आहे. कोकणातील पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये या निधीतून वेगवेगळी कामे केली जणार आहेत. यामध्ये प्रमुख्याने धूप प्रतिबंधक बंधारा, शेलटर हाऊस, अंडर ग्राउंड केबलिंग ही कामे केली जाणार आहेत.

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावर ठाकरे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार तातडीने अध्यादेश (Ordinance) काढणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) झाली. या बैठकीमध्ये सर्वांनुमते आरक्षण देण्याच्या दृष्टीने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Web Titel :- Maharashtra Cabinet Decision | maharashtra cabinet meeting decision today amid rain flood and landslide 3000 crore announced for konkan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या

Coronavirus | चिंता कायम ! …तोपर्यंत कोरोना संकट रहाणारच; ‘WHO’ चा इशारा

OBC Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार अध्यादेश काढणार