Maharashtra Cabinet Decisions | लोहगाव विमानतळाकडे क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षणात बदल, जाणून घ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decisions | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज (11) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आले. यामध्ये लोहगाव विमानतळाकडे (Lohegaon Airport) क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षणात बदल (reservation Change) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Decisions)

नगर विकास विभाग (Urban Development Department)

सांगली महापालिका (Sangli Municipal Corporation) क्षेत्रातील खेळाच्या मैदानावरील आरक्षणातील भागश: बांधकाम व्याप्त क्षेत्र वगळण्यासाठी फेरबदलास मान्यता

लोहगाव (जि.पुणे) विमानतळाकडे क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षण बदल

ऊर्जा विभाग

महाऊर्जेकडे नोंदणी झालेल्या ४१८ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित होण्यासाठी मुदतवाढ

वित्त विभाग (Finance Department)

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डाशी (Aadhaar Card) जोडणार

कृषि विभाग (Agriculture Department)

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविणे व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविणार.

 

Web Title :- Changes in the reservation for the road passing through the playground space near Lohgaon Airport pune know the 5 important decisions of the Cabinet meeting

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा