Homeताज्या बातम्याHSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची...

HSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचं झालं एकमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वीच ठाकरे सरकारने राज्यातील 10 वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता 12 वी बोर्डाच्या HSC Bord Exam परीक्षाही रद्द करण्यात येणार आहेत. बुधवारी (दि. 2) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत झाले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन मंडळाचे शिक्कामोर्तब झाल्यावर निर्णय उच्च न्यायालयाला कळवण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Gold Price Today : सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव

कोरोनामुळे यंदा CBSE बोर्डाची 12 वीची परीक्षा HSC Bord Exam रद्द केली आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, कोरोना, पाऊस आदी बाबींवर विचार करण्यात आला. केंद्राला प्रस्ताव दिला होता. त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रस्ताव दिला आहे त्यांच्याकडून उत्तर आले की आम्ही त्यावर निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे आहे. दरम्यान 12 वीची परीक्षा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. राज्य सरकार परीक्षा घेण्याविरोधात होते. तर भाजपाचे नेते विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असा हेका धरून परीक्षा घेण्यासाठी आग्रही होते. मात्र, केंद्र सरकारनेच सीबीएसईची परीक्षा रद्द केल्याने आता राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.

कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेत पैसे गुंतवा, आगामी 6 महिन्यात मिळतील 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न, जाणून घ्या

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News