फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ‘हे’ आहेत नवे मंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शपथ विधी सोहळा पार पडला आहे. अनेक दिवसांपासून हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. तो आज सकाळी ११ वाजता पार पडला आहे.

या शपथविधी सोहळ्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसमधून आयात केलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शपथ घेण्याची पहिली संधी दिली. त्यानंतर आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर, संजय कुटे, सुरेश खाडे, अनिल बोंडे, अशोक उईके, तानाजी सावंत यांनी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली.

योगेश सागर, संजय उर्फ बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर रिपाईंचे अविनाश महातेकर यांनाही राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.

नवीन मंत्रीमंडळ विस्तारासाठी युतीने १०-२-१चा फॉर्म्युला वापरला आहे. यात १० भाजपला, २ शिवसेनेला तर रिपांईला १ मंत्रीपद देण्यात आले आहे. रिपाईंला लोकसभेत एकही जागा दिली नव्हती तरी रिपाईंने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमिवर भाजपने रिपाईंला खुश ठेवण्यासाठी एक राज्यमंत्री पद दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव