…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोष उफाळला, समर्थकांच्या राजीनामा सत्रास सुरूवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारला अखेर आज मंत्रिमंडळ शपत विधीसाठी मुहूर्त मिळाला मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील असंतोष बाहेर यायला सुरुवात झाली आहे. अनेक आमदारांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अपेक्षाभंग झाल्याने आमदार समर्थकांनी आपल्या नाराजीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रीपदाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा निषेध केला आहे. थोपटे समर्थक आणि भोर नगरपालिकेच्या २० नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे तसेच एकहाती सत्ता असल्याने स्वतंत्र गट निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी काळा झेंडा लावून तो पेटवून देत निषेद व्यक्त केला आहे.

वाई येथील राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना देखील मंत्री पदापासून डावलण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे वाईतील पाटील समर्थकांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे.

आदित्य ठाकरेंसाठी या नेत्याचे नाव कापण्यात आले
संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना देखील मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा होती मात्र ऐन वेळी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील राऊत यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीतून कापण्यात आल्याचे समजते. शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/