Homeताज्या बातम्याMaharashtra Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याला एक मंत्रीपद, चंद्रकांत पाटलांनी घेतली...

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याला एक मंत्रीपद, चंद्रकांत पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, इतरांना संधी नाही?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | आज राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये पुणे जिल्ह्याला कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Kothrud MLA Chandrakant Patil) यांच्या रुपाने मंत्रिपद मिळाले. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या जिल्ह्यातील इतर नेत्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) संधी मिळालेली नाही. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जिल्ह्यात अजून एक मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र आजच्या मंत्रिमडंळ विस्तारानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र 2019 च्या निवडणूकीत पक्षाने मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. चंद्रकात पाटील सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

 

मागील महिन्याभरापासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) वाट पाहिली जात होती. अखेर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. दौडचे आमदार राहुल कुल (Daud MLA Rahul Kul), पर्वती मतदारसंघातून (Parvati Constituency) आमदार म्हणून निवडून आलेल्या माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) या देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, मिसाळ यांची पुण्यातून पहिल्या महिला मंत्री होण्याची शक्यता आता मावळली आहे.

 

चंद्रकांत पाटलांचा अल्प परिचय
चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 मध्ये झाला. जुलै 2016 पासून ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल (Revenue), सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे ते मंत्री होते. जुलै 2019 पासून भाजपचे (BJP) महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे बालपण गेलं. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट यथील सिद्धार्थ महाविद्यालयातून 1985 साली त्यानी पदवी प्राप्त केली.

विद्यार्थी परिषदेतील संघटनात्मक बंधणीचे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य पाहून भाजपचे नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांना पक्षाचे काम करण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 2004 मध्ये त्यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली.
2009 मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली.
या निवडणुकीत शरद पाटील (Sharad Patil) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करुन ते विधान परिषदेत पोहचले.

 

2013 मध्ये पक्षाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. यानंतर 2014 मध्ये त्यांनी पुन्हा पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवून विजयी झाले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवत सरकार स्थापन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार,
पणन, सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली.
2016 पासून ते महसूल, सार्वजनिक बंधाकाम खात्याचे मंत्री होते.
तसेच दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर (Pandurang Phundkar) यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार सोपवण्यात आला.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | BJP leader chandrakant patil took oath as minister from pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात घरातून प्रोत्साहन दिले पाहिजे – दिलीप वळसे पाटील

 

Builder Mangal Prabhat Lodha | बांधकाम व्यावसायिक शिंदे सरकारचे बनले मंत्री

 

Pune Crime | ७ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; चिमुरडीने युक्तीने करुन घेतली स्वत:ची सुटका

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News