Maharashtra Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार? भाजपच्या 6 व शिवसेनेच्या 4 जणांना स्थान मिळण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्यातील सत्तांतराला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे. शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळले आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांचे सरकार आले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त मिळालेला नाही. परंतु आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी (Shiv Sena Vardhapan Din) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. हा विस्तार छोटेखानी असेल अशी महिती समोर आली आहे. दिल्लीतूनच तसे आदेश देण्यात आले आहेत, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) 19 जून पर्वी होण्याची दाट शक्यता असल्याने भेटीगाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. छोटेखानी विस्तार लवकरच उरकला जाईल. काही इच्छुकांना महामंडळ देऊन त्यांची बोळवण केली जाईल. तर उर्वरित 13 मंत्रिपदाचे वाटप हे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केले जाऊ शकते.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या (BJP) 6 आणि शिवसेनेच्या 4 जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
भाजपचे 4 कॅबिनेट मंत्री तर 2 राज्यमंत्री आणि शिवसेनेचे 2 कॅबिनेट मंत्री तर 2 राज्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.
मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काहीजण नाराज होण्याची शक्यता लक्षात घेता महामंडळाचे वाटप करुन
त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कुठल्या महामंडळावर कुणाची वर्णी लावावी यासाठी यादी
तयार केली जात आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत
(Uday Samant) यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Web Title :  Maharashtra Cabinet Expansion | Cabinet expansion ahead of Shiv Sena Vardhapan Din? 6 people from BJP and 4 people from Shiv Sena are likely to get seats

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Corruption In Maharashtra Education Department | राज्यातील ‘त्या’ सर्व शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अ‍ॅन्टी करप्शनला पत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ

Pune Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या पुण्यातील आजचे भाव

Ira Khan Wedding | अमीर खानच्या घरी सुरु आहे लग्न सराईची लगबग; फोटो सोशल मीडियावर व्हायरल