Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला?, कोणाला मिळणार संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे (Maharashtra Cabinet Expansion) वेध भाजप (BJP) आणि शिंदे गटातील आमदारांना (Shinde Group MLA) लागले आहेत. रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा (JP Nadda) यांच्या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. हा विस्तार 23 किंवा 24 मे रोजी होण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडलेला होता. मात्र, न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे सरकारला दिलासा दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालिंना वेग आला आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गट आणि भाजपमधील कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लगाले आहे.

दरम्यान, ज्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे अशा आमदारांची नावे पुढे आली आहेत. यामध्ये भरत गोगावले Bharat Gogawale (जलसंधारण), संजय शिरसाठ Sanjay Shirsath (परिवहन किंवा सामाजिक न्याय), प्रताप सरनाईक Pratap Sarnaik (गृहनिर्माण), बच्चू कडू (दिव्यांग विकास), सदा सरवणकर (Sada Saravankar), यामिनी जाधव (Yamini Jadhav), अनिल बाबर (Anil Babar) आणि चिमन आबा पाटील (Chiman Aba Patil) या आमदारांच्या नावाचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते.
त्यापूर्वी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले होते.
तर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने कामे खोळंबू लागली आहेत.
त्यामुळे जनतेत नाराजी आहे, आणि याचा फटका सरकारला बसू शकतो, असा इशारा बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी दिला होता.

Web Title : Maharashtra Cabinet Expansion | cabinet expansion soon in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘तेढ निर्माण होईल असं काही बोलू नका’, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं

Sushma Andhare | ‘….तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का’, जाधव यांच्या दाव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Pune Railway Station News | पुणे रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व पाणी बॉटल विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईचा दणका