Maharashtra Cabinet Expansion | राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? देवेंद्र फडणवीसांनी केलं जाहीर; म्हणाले… (व्हिडिओ)

ADV

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारला एक वर्ष होत आहे मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. अखेर राज्यातील रखडेलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यात होईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि.29) दिल्लीला गेले होते. दिल्लीहून परत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्यासंदर्भात बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतलीच. मला वाटतं जुलै महिन्यात आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) करू, असे फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) आधी होणार की राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आधी होणार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, केंद्राच्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काहीही आपपसात संबंध नाही. केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही राज्याच्या विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत.

मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी काही मंत्र्यांना बदलणार, काहींची खाती बलणार अशी चर्चा आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ज्याला बातमी मिळाली नाही तो एक बातमी तयार करतो आणि सोडून देतो. अशा बातम्यांमध्ये कोणतीही तथ्य नाही.

Web Title :  Maharashtra Cabinet Expansion | Cabinet expansion will take place in the month of July, according to Devendra Fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा