Maharashtra Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्तार कधी? प्रोटोकॉल विभागाला अलर्ट! मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भरत गोगावलेंचं सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाची (Shinde Group) यादी तयार असून भाजपचा (BJP) हिरवा कंदील येताच मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) या महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये दोन अलर्ट प्रोटोकॉल विभागाला (Protocol Department) देण्यात आले आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठ दिवसांत होण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केले आहे.

 

भरत गोगावले म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) वेळ जवळजवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांच्या आत रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे आम्हाला वाटत आहे. तर रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर या कार्यक्रमाला पालकमंत्री पदाचा बहुमान मिळणार असल्याचे गोगावले म्हणाले. त्यामुळे राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. जे काही कॅबिनेट मंत्रीपद आहेत, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जे काही बोलतील त्याप्रमाणे घेऊ. यासाठी नवीन कपडे देखील शिवले असल्याचे गोगावले यांनी सांगिले.

 

मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणी दूर झाल्या आहेत, जे मंत्रिपद मिळेल त्याला पूर्ण न्याय देऊ, असं गोगावले यांनी सांगितले. तर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत, म्हणजे होईल. माझं नाव दरवेळी चर्चेत असतं, असं सूचक विधान संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे.

भाजप-शिवसेनेच्या सर्वच आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा असून, त्यात गैर काहीच नाही.
मात्र याची खरी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच करतील.
त्यामुळे आम्हाला काय वाटते त्यापेक्षा त्यांच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे.
तर ते सांगतील तीच तारीख मंत्रिमंडळ विस्ताराची असणार आहे.
तसेच मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने जर कोणी नाराज झाला, तरी त्याला कुठे नं कुठे सामवून घेतले जाईल, त्यांना वाऱ्यावर सोडले जात नाही, असेही शिरसाट यांनी सांगितले.

 

 

 

Web Title :  Maharashtra Cabinet Expansion | cabinet expansion within eight days said
shivsena shinde faction mla bharat gogawle

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा