Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Maharashtra Cabinet Expansion) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नवं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्यांचा शपथविधी झाला नसल्याने विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त मिळाल्याचे दिसत आहे.

 

राज्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी (Swearing In) होऊ शकतो, अशी माहिती आहे. 10 ते 12 मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील माहिती मिळत आहे.

 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिव राजेंद्र भागवत (Legislative Secretary Rajendra Bhagwat) यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (Rainy Season) तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचे बोललं जात आहे.

 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला काल देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, तुम्ही जो विचार करत आहात, त्यापेक्षा लवकर होईल.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विस्तार करु नका, असे सांगितलेलं नाही.
त्यामुळे न्यायालयातील सुनावणीसाठी विस्तार रखडलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत स्पष्ट केलं होतं.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis
shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा