मंत्री पद मिळालेल्या ‘या’ दिग्गजानं सांगितला ‘किस्सा’, रात्रभर झोपलो नव्हतो, कारण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर ठरला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. तिन्ही पक्षांचे एकूण 35 आमदार मंत्रपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसमधील अनेक अनुभवी नेत्यांचा यात समावेश आहे. विदर्भातील काँग्रेसचे आक्रमक नेते विजय वडेट्टीवार यांनाही मंत्रिपदासाठी संधी मिळाली आहे. मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांचा एक गमतीशीर किस्सा शेअर केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “श्रद्धा आणि सबुरी कामाला आली. पण मी रात्रभर झोपलो नव्हतो. जेव्हा बाळासाहेब थोरातांचा रात्री 2 वाजता मेसेज आला. त्यानंतर पत्नीनं साईबाबांसमोर अगरबत्ती लावली. त्यानंतर शांत झोपलो.” असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर आपला अनुभव सांगितला.

आज दुपारी 1 वाजता तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात महाविकासआघाडीचे एकूण 35 आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मंत्रिमंडळातील 35 आमदारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. खास गोष्ट अशी की, आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेट मंत्रपद निश्चित झालं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/