‘या’ भीतीमुळं ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन झाले तरी खातेवाटपाला विलंब झाला. अखेर ठाकरे सरकारचं खाते वाटप झाले असून सात मंत्र्यांना तब्बल 56 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र हे खातेवाटप तात्पुरते असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. खाते वाटप झाले असले तरी भाजपच्या भीतीनं ठाकरे सरकारचा मंत्रिमडळ विस्तार लांबवणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी तीनही पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना खातेवाटप करण्यात आले नव्हते. सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले तरी खातेवाटप झाले नसल्याने बिन खात्याचे मंत्री अशी टीका होऊ लागली. अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.12) खाते वाटप केले. सात मंत्र्यांवर 56 खात्यांची जबाबदारी देण्यात आली. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे सरकारच्या मत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘या’ भीतीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय नाही
उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केले असले तरी हे तात्पुरत्या स्वरुपाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. एका मंत्र्यानं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याचे कारण सांगितले आहे. भाजपनं कर्नाटकात जो प्रयोग केला, तसा प्रयोग राज्यात करू नये, या भीतीमुळे योग्य खबरदारी घेतील जात आहे. अधिवेशन काळात काही आमदारांनी पाठिंबा काढून घेतला तर सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सरकार कोणताही धोका पत्कारत नसल्याचे एकान नेत्याने सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/