Maharashtra Cabinet Expansion | राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे ; काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू?

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Maharashtra Cabinet Expansion । काही दिवसापुर्वी केंद्रातील मोदी सरकारकडून मंत्रीमंडळाचा (Union Cabinet Expansion) विस्तार करण्यात आला. याचबरोबर आता महाराष्ट्रात देखील मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचे (Maharashtra Cabinet Expansion) संकेत मिळत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे काँग्रेस (Congress) पक्षाकडून त्याबाबत प्रस्ताव जाण्याची शक्यता निर्माण झालीय. एक दोन दिवसाआधी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मालिकार्जून खर्गे आणि एच. के. पाटील मुबंईत दाखल झाले होते. यादरम्यान हा निर्णय झाल्याचे समोर आले आहे. यावरून आता राज्यात मंत्रिमंडळाचे वारे कोणाला लागणार? हे पाहणं महत्वाचं आहे. Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet reshuffle two congress ministers will be dropped cm uddhav thackeray cabinet

काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आहे.
याची समिक्षा करून 2 काम न करणाऱ्या अथवा प्रदर्शन खराब असलेल्या मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात येणार आहे.
तर काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या 2 मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितलं आहे.

याचबरोबर, कोरोनाच्या काळामध्ये काही काँग्रेसचे मंत्री कुठेच दिसले नाहीत.
ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे त्यांची यादी सध्या तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, आता पुढील कामकाज सर्व मुख्यमंत्री (CM) आणि राज्यपालांच्या (Governor) उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे, या अकार्यक्षम 2 मंत्र्यांमध्ये एक मुंबईतील तर दुसरे विदर्भामधील असल्याचं सूत्राकडून सांगण्यात आलं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे आता ठाकरे सरकारच्या (Thackeray government) मंत्रिमंडळाच्या फेरबदलात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासहित मंत्रीपदाची देखील जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

 

विधानसभा अध्यक्षपदासाठी नाव निश्चित –

मंत्रिमंडळात 2 ते 3 मंत्री बदलले जाण्याची शक्यता आहे. तसेच, महत्वाचे म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचे (Speaker of the Assembly) नाव निश्चित झालं आहे.
तसेच, यावरून पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), हे तिघे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याच एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं आहे.

Web Title : Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet reshuffle two congress ministers will be dropped cm uddhav thackeray cabinet

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri Crime | सेट्रींगचे काम करताना चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु

CM Uddhav Thackeray | काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला टोला; म्हणाले…

Indurikar Maharaj | ‘दारूची दुकानं अन् सर्व काही सुरू, फक्त देवाची मंदिरे बंद असल्यानं वाईट वाटतं’ – इंदुरीकर महाराज