Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे गटातील शपथ घेतलेल्या या 3 मंत्र्यांना भाजपचा होता कडाडून विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ (Shinde-Fadnavis Government) विस्तार मंगळवारी (दि.9) झाला. मात्र त्याआधी पडद्यामागे काय घडलं हे आता समोर येऊ लागलं आहे. शिंदे गटातील (Shinde Group) तीन मंत्र्यांच्या नावाला भाजपचा (BJP) विरोध (Opposed) होता, अशी माहिती समोर आली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपने विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाम भूमिका घेतल्याने या तिघांचा मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) समावेश करण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

 

भाजपचा का होता विरोध ?

दीपक केसरकर – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane), आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासोबत असलेला वाद या विरोधाचं एक कारण आहे. कारण शिंदे गट भाजपसोबत असला तरी केसरकर यांनी राणे यांच्याबाबतची आपली भूमिका बदलली नव्हती. दुसरं कारण म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी (Maharashtra Cabinet Expansion) केसरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी केलेली वक्तव्ये शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट यांच्यातील दुरावा कमी करणारी होती. यामुळे भाजपचा विरोध होता.

 

संजय राठोड – एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan Death Case) भाजपने संजय राठोड यांच्याविरोधात मोठं आंदोलन उभारलं होतं. यामुळेच मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा (Resignation) द्यावा लागला होता. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्यासोबत काम करावं लागेल. त्यामुळे आपल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं, अशी भीती भाजपला होती. यामुळे राठोड यांच्या नावाला विरोध होता.

 

अब्दुल सत्तार – टीईटी घोटाळ्यामध्ये (Maharashtra TET Scam) अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने भाजपचा विरोध होता.
याशिवाय सत्तार यांना मंत्री केल्याने हिंदुत्ववादी (Hindutva) सरकारमध्ये मुस्लीम मंत्री कसा असा प्रश्न निर्माण होईल, असं भाजपला वाटत होतं.
तसेच सत्तार यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
यामध्ये त्यांनी एका व्यक्तीला देवाच्या नावावरुन शिव्या दिल्या होत्या. त्यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते.

 

Web Title : –  Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा