Maharashtra Cabinet Expansion | दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला पाहिजेत ‘ही’ खाती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकनाथ शिंदे-भाजप युती (Eknath Shinde – BJP) सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ खातेवाटपात ग्रामीण भागाच्या विकासाशी (Rural Development) निगडित एकही खाते वाट्याला न आल्याने शिंदे गटातील (Shinde Group) बरेच मंत्री नाराज झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) ग्रामीण भागाशी निगडित एक-दोन खाती मिळावीत यासाठी आता शिंदे गटाकडून आग्रह धरला जात आहे. यावेळी भाजपकडे असलेल्या ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (Public Construction), जलसंपदा या खात्यांपैकी एक-दोन खाती शिंदे गटाला मिळावीत, अशी आग्रही मागणी शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी (CM Eknath Shinde) या मंत्र्यांनी चर्चासुद्धा केली आहे.

शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ऑगस्ट महिन्यात झाला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये खातेवाटप करण्यात आले. यात भाजपच्या वाट्याला ग्रामीण भागाशी निगडित ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पशुसंवर्धन व दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय अशी महत्त्वाची खाती आली तर शिंदे गटाच्या वाट्याला ग्रामीण भागाशी निगडित कृषी तसेच रोजगार हमी व फलोत्पादन ही खाती आली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करावी, अशी मागणी शिंदे गटातील मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब

शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लांबत असल्याने अस्वस्थ झाले आहेत.
पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मंत्र्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता.
मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी विस्तार होत नसल्याने नाराज आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
आता नवरात्रीनंतर (Navratri) मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | second cabinet expansion shinde group wants accounts related to rural areas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Babar Azam-Virat Kohli | बाबर आझमने रिझवानसोबत रचला इतिहास, विराट कोहलीला टाकले मागे

वेदांता-फॉक्सकॉननंतर आता PhonePe देखील महाराष्ट्र सोडणार