ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणूका आणखी 3 महिन्यांनी पुढं ढकलल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळानं आज एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळानं महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूका आणखी 3 महिने पुढं ढकलल्या आहेत. या निवडणूका 1 मे पुर्वी होणं अपेक्षित होतं मात्र त्यास राज्य मंत्रिमंडळानं 27 एप्रिल रोजी मुदतवाढ दिली होती.

राज्य मंत्रिमंडळानं आज हा निर्णय घेतला आहे. 27 जुलैपासून पुढील 3 महिन्यांसाठी महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणूकीस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या महापौर आणि उपमहापौरांना 27 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.