Maharashtra Cabinet | शिंदे-फडणवीस सरकारमधील महत्त्वाचे खातेवाटप जवळपास निश्चित?; जाणून घ्या कोणाकडे जाणार कुठले खाते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet | शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Government) लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच खातेवाटपाची (Maharashtra Cabinet) घोषणा करू, असे म्हटले होते. दरम्यान, काही महत्वाच्या खात्यांचे वाटप झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाकडे (Shinde Group) नगरविकास (Urban Development), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) खाते जाणार आहे. तसेच भाजपकडे (BJP) गृह (Home), अर्थ (Finance) व महसूल खाते (Revenue) जाणार आहे. यातही गृह खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) स्वताकडे ठेवणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. (Maharashtra Cabinet)

 

भाजपच्या वाट्याला 27 तर शिंदे गटाच्या वाट्याला 14 मंत्रिपदे येणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात महत्त्वाच्या महत्वांच्या खात्यांसाठी दोन्हीकडील नेते हालचाली करत आहेत. भाजपकडे येणारे अर्थ व महसूल खाते कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना दिले जाणार असल्याची शक्यता आहे.

 

11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार्‍या सुनावणीनंतर मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ शिवसेना (Shivsena) वगळता एकूण 39 आमदारांनी त्यांना साथ देत सरकारला पाठिंबा दिला आहे.
यातील आठ आमदार मंत्री होते. अशा स्थितीत शिंदे यांना पाठिंबा देणार्‍या किती आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या कोट्यात काही प्रमाणात कपात होऊ शकते.
शिंदे गटाला 14 मंत्रीपदे आणि भाजपाकडे 27 मंत्रिपत्रे येतील.

 

Web Title :- Maharashtra Cabinet | important department eknath shinde devendra fadnavis government maharashtra cabinet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Water Supply | पुणेकरांना दिलासा ! बकरी ईद व आषाढी एकादशीमुळे पुण्यातील पाणी कपातीच्या वेळापत्रकात बदल

 

Mukhtar Abbas Naqvi | मुख्तार अब्बास नक्वींचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार ?

 

Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त