Maharashtra Cabinet Metting :ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 6 मोठे निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संकट असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबीनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन प्रकल्पांना या बैठकीत मान्यता देण्यात आली, या शिवाय सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
1. जळगाव जिल्ह्यातील हतनूर, वरणगाव तळवेल या तीन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता.
2. धरण पुनर्स्थापन व सुधारणा प्रकल्प टप्पा 2 व 3 अंतर्गत समाविष्ट प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रियेस मान्यता.
3. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे व कार्यपद्धतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यता.
4. बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्ता वाढ करणे व बालगृह/निरीक्षण गृह, खुले निवारा गृह आणि विशेष दत्तक संस्थेतील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक 8 टक्के वाढ.
5. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियम 1998 मध्ये सुधारणा
6. उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे.

गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा – मुख्यमंत्री
राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्यायोगे सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल, अशे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रल्पांची सध्यस्थिती, अडी अडचणी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या उपाययोजना यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते.