Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Meeting | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर तर उस्मानाबादचे (Osmanabad) नामांतर धाराशिव केले होते. ठाकरे सरकारचा या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. 29 तारखेला तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी (Legal Difficulties) निर्माण होऊ नयेत म्हणून आम्ही पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता. आजच्या बैठकीत आम्ही औरंगाबादचे नामकरण (Naming) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असं करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव (Dharashiv) आणि नवी मुंबई येथील विमानतळाला (Navi Mumbai Airport) लोकनेते दि.बा. पाटील (D.B. Patil) यांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय (Maharashtra Cabinet Meeting)

औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय

उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय

एमएमआरडीएला (MMRDA) 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार

 

Web Title :- cm eknath shinde devendra fadnavis aurangabad osmanabad naming as chhatrapati sambhaji nagar dharashiv maharashtra cabinet meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar On Jayant Patil | ‘जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक’ – गोपीचंद पडळकर

 

Maharashtra Rains Update | राज्यात सर्वत्र ‘धो-धो’; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

 

Maharashtra Politics Palghar Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! पालघर जिल्ह्यातील खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात