मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Meeting | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांना दिवाळीत 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. (Maharashtra Cabinet Meeting)
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
१. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश. (अन्न व नागरी पुरवठा)
२. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ. (ऊर्जा विभाग)
३. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. (अल्पसंख्याक विकास विभाग)
४. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी. (विधी व न्याय)
५. इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा. (गृहनिर्माण)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
IPS Rajnish seth – MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) मिळाले अध्यक्ष;
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे पदभार; नवीन DGP कोण?
Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ अपघात ! मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू